वारणानगर मध्ये महिला दिनानिमित्त शोभाताई कोरे आईसाहेब स्त्री कर्तृत्व सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न...Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya Warananagar

 
वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त "शोभाताई कोरे आईसाहेब स्त्री कर्तृत्व सन्मान पुरस्कार" समारंभ प्रसंगी सौ. शुभलक्ष्मी कोरे, सौ. श्रुती कोरे, सौ. स्नेहा कोरे, डॉ. वासंती रासम,  कु. अमृता जाधव,  श्रीमती तृप्ती मुळीक,  कु. कोमल ढोले,  प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर.

वारणानगर/ प्रतिनिधी :   

वारणानगर, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय मध्ये जागतिक महिला दिना निमित्त 'श्रीमती शोभाताई कोरे (आईसाहेब) स्त्री कर्तृत्व सन्मान: २०२३' व 'जागतिक महिला दिन परिसंवाद' उत्साहात संपन्न झाला. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे -सावकर यांनी समारंभ शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानी समारोह संयोजक प्राचार्य डॉ. प्रकाश चिकर्डेकर होते. कार्यक्रमात वारणा भगिनी मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. स्नेहा निपुणराव कोरे (वहिनी), सावित्री महिला औद्योगिक संस्थेचे अध्यक्षा सौ. शुभलक्ष्मी विनयराव कोरे (वहिनी),डॉ. वासंती रासम,  महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि  पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश न्याय दंडाधिकारी पदी नियुक्त झालेल्या अंबपवाडी गावच्या अमृता जाधव, सिंधुदुर्ग पोलीस मध्ये मान्यवर मंत्री महोदयांच्या गाडीचे सारथ्य करणाऱ्या पाडळी तालुका हातकणंगले येथील तृप्ती मुळीक, दापोली पोलीस ठाण्यात लागलेल्या आगीमध्ये अतुल्य कामगिरी करून धैर्य दाखवल्याबद्दल कोमल ढोले, कोडोली तालुका पन्हाळा यांना "श्रीमती शोभाताई कोरे स्त्री कर्तृत्व सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मान चिन्ह सन्मानपत्र संदर्भ ग्रंथ इत्यादी प्रदान करून गौरव समारंभ संपन्न झाला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रजलन झाले. पाहुण्यांचे स्वागत' जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्यांचा ध्यास दे....' या नाजिया मुल्ला व चैत्राली पवार यांनी गायलेल्या सुमधुर गीताने करण्यात आली.

प्राचार्य  डॉ. प्रकाश चिकुर्डेकर हे स्वागत व प्रास्ताविक करतांना म्हणाले, "जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने श्रीमती शोभाताई कोरे (आईसाहेब) यांच्या नावे स्त्री कर्तृत्व सन्मान देत असताना अत्यंत आनंद होत आहे. श्रीमती आईसाहेब शोभाताई कोरे यांचे कार्य-कर्तृत्व प्रेरणादायी, आदर्शवादी व कालातीत असून त्यांनी उभ्या आयुष्यात वारणा खोऱ्यातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न केले. त्यापासून प्रेरणा घेऊन तरुणींनी स्व: कर्तृत्व घडवावे. महिलांचे सक्षमीकरण करणे हे स्वर्गीय सहकार महर्षी तात्यासाहेब व आईसाहेबांचे स्वप्न होते. स्वर्गीय आई साहेबांचे स्वप्न आणि त्यांच्या आचार विचार संस्कृती आणि संस्कारांचा वारसा पुढे चालवणे हेच आपले ध्येय असल्याचे ते म्हणाले. आईसाहेबांच्या विचारावरती चालून काही वेगळे करणाऱ्या स्त्री कर्तुत्वाचा होत असलेला सत्कार म्हणजे त्याची स्वप्नपूर्ती आहे . यावेळी तृप्ती मुळीक, कोमल ढोले व अमृता जाधव यांच्या कार्याचा त्यांनी मुक्त कंठाने गौरव केला. शिवाय या सर्वांच्या कार्यापासून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी समाजाला आदर्शवत होईल असे कार्य करावे व आपल्या कर्तुत्वाची छाप जनमानसांवर उमटवावी असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी सौ. स्नेहा निपुणरावजी कोरे (वहिनी) व सौ. शुभलक्ष्मी विनयरावजी कोरे (वहिनी) यांना  डॉ. वासंती रासम यांच्या हस्ते 'श्रीमती शोभाताई कोरे (आईसाहेब) स्त्री कर्तृत्व सन्मान:२०२३' देऊन सन्मानित करण्यात आले. तर सौ. श्रुती कोरे व डॉ. वासंती रासम यांचा सत्कार  डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

सौ. शुभलक्ष्मी कोरे (वहिनी) यांनी श्रीमती शोभाताई कोरे (आईसाहेब) यांच्या आठवणींना उजाळा दिला. आज मला मिळालेला पुरस्कार व सन्मान हा खऱ्या अर्थाने आईसाहेबांची शिकवण व संस्कार याचा सन्मान आहे. आईसाहेबांच्या संस्काराची शिदोरी ही आजन्म पुरणारी व सदैव प्रेरणा देणारी आहे. वारणा खोऱ्यातील महिलांच्या साठी आईसाहेबांनी आयुष्य वेचले त्यासाठी आम्हीही तत्पर आहोत असेही त्या म्हणाल्या. सौ. स्नेहा कोरे (वहिनी) म्हणाल्या, "आई साहेबांचे कार्यकर्तृत्व प्रेरणादायी आहे त्या उच्चशिक्षित होत्या तरीही साधी राहणी वेळेचे महत्व कामाची तत्परता त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळाली. वारणा परिसरातील महिला स्वावलंबी व्हाव्यात त्याच्यासाठी आम्हीही प्रयत्नशील राहू." सौ. श्रुती कोरे यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, आईसाहेबांच्या नावे पुरस्कार सुरू केल्याचा अत्यानंद आहे. आईसाहेबांच्या नावे सुरू केलेल्या पुरस्कारा खंड पडू देऊ नका वारणा खोऱ्यातील कर्तृत्ववान महिलांना प्रेरणा देण्यासाठी हे आवश्यक आहे."

यावेळी विशेष कर्तृत्व सन्मान प्राप्त सत्कारमूर्ती तृप्ती मुळीक यांनी त्यांच्या कारकिर्दीत तत्कालीन उपमुख्यमंत्री मान्यवर व इतर सन्माननीय मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य करण्याचे सौभाग्य लाभले. तसेच महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व्हीआयपी व्यक्तींच्या गाडीचे सारथ्य करणारी पहिली महिला ठरल्याचा आनंद होत असल्याचे मत व्यक्त केले. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील स्त्रीला हे शक्य आहे. कोमल ढोले पोलीस स्टेशन आग कांडातील थरार सादर केला . पोलीस ठाण्यातील दारुगोळा व दफ्तर सुरक्षित ठेवण्यासाठी आपण केलेल्या शर्तीचे चित्तथरारक अनुभव कथन केले. त्यावेळी आपण केवळ कर्तव्यच प्रमाण मानले.  प्रत्येक व्यक्तीने आपल्या कर्तव्याची जाण ठेवून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे. असे मत व्यक्त केले." वयाच्या २४ व्या वर्षी न्याय दंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश पदी नियुक्त झालेल्या अमृता जाधव म्हणाल्या,"विद्यार्थ्यांनी स्वप्न पहावीत, ध्येय ठरवावित परंतु आभासी दुनियेत न जगता वास्तवाचे भान ठेवावे.  प्रत्येकाने ध्येयाकडे डोळसपणाने बघायला शिकले पाहिजे व ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली पाहिजे तेंव्हाच यश प्राप्त होते. 

यावेळी अध्यक्षीय मनोगतात डॉ. वासंती रासम म्हणाल्या की, "जागतिक महिला दिन हा खऱ्या अर्थाने स्त्री कर्तुत्वाचा सन्मान आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धा करीत यश संपादन करीत आहे. आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे. महिलांना संधी मिळत राहिल्यास त्या स्वकर्तुत्वाचे नवे आयाम निर्माण करीत आहे. एकविसाव्या शतकातील स्त्री ही खऱ्या अर्थाने  सक्षम व सबल स्री आदर्शवत उदाहरण म्हणून पुढे येत आहे. आपणही आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून कर्तुत्व सिद्ध करावे. डॉ. प्रीती शिंदे पाटील, डॉ. संतोष जांभळे, डॉ.एस. एस. खोत, दादा बच्चे ,भालचंद्र शेटे,कार्यालयीन प्रबंधक बाळासाहेब लाडगावकर यांनी संयोजन सहाय्य केले. या वेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी प्रा. सौ. संध्या साळोंखे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर प्रा. सौ. शिल्पा पाटील यांनी सूत्रसंचालन व प्रा. सौ. सीमा नलावडे यांनी आभार मानले.

 Promoted content :  

🔴 वारणेत प्रथमच २०२३ पासून दिला जाणार श्रीमती शोभाताई कोरे (आईसाहेब) स्त्री कर्तृत्व सन्मान २०२३ चा पुरस्कार जाहीर.... 

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये शेअर बाजारातील संधी, समज व गैरसमज या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन.

🔴 महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न 

🔴 व्हिजन ग्रीन काखे तर्फे २०२५ झाडांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प.../ Vision Green Kakhe

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वतीने हिंदी विषयाच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात देशातील व परदेशातील प्रतिनिधींनीसह ७७० हून अधिक हिंदी प्रेमी संशोधक अभ्यासकांचा सहभाग.

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित.

Post a Comment

0 Comments