श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच ३ विद्यार्थिनींची मुंबई पोलिस व रेल्वे पोलिस मध्ये निवड झाल्याबद्दल आ. डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते सर्व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

 

वारणानगर \ प्रतिनिधी : 

येलूर (ता.शाहूवाडी) येथील श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर संचलित श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालयाच्या १० विद्यार्थिनींना सन २०२२ - २३ सालामध्ये शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल तसेच ३ विद्यार्थिनींची मुंबई पोलिस आणि रेल्वे पोलिस मध्ये निवड झाल्याबद्दल आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते सर्व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला... 

कु.आयेशा दस्तगिर मुजावर (रा.मांजरे),काजल बाळू पाटील (रा.परळे), तेजस्विनी आनंदा शिंदे(रा.कडवे), निकिता निळकंठ पाटील(रा.परळे), तन्वी महेश वळीवडेकर (रा.मलकापूर), पल्लवी संभाजी जाधव (रा.येलूर), सरिता नामदेव बोटांगळे(रा.वारूळ), सायली सुभाष कदम (रा.पेरीड), प्राजक्ता संजय पाटील(रा.सावे), आसावरी सतिश पाटील (रा.कांदे, ता.शिराळा) या सर्व विद्यार्थ्यांनीना शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. 🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या खेळाडूंची राष्ट्रीय बास्केट बॉल स्पर्धेसाठी निवड. / Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya (YCWM)

तसेच श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थी कु.हर्षदा हणमंत आरसेकर (रा.वाकोली) व कु.प्राजक्ता संजय पाटील (रा.सावे) या दोघींची मुंबई पोलिस मध्ये निवड व कु.रविना ज्ञानदेव बजागे (रा.बजागेवाडी) हि रेल्वे पोलिस मध्ये निवड झाल्याबद्दल आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीमती शोभाताई कोरे महिला महाविद्यालय येलूर शाखेचे समन्वयक भालचंद्र शेटे,शाखा समन्वयक दिलीप पोवार,प्रभारी प्राचार्य एम. जी. पाटील यांच्यासह सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

  हे हि वाचा :  

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये प्रोफेशनल बँकिंग प्रशिक्षण आणि नोकरीविषयक मार्गदर्शन" शिबीराचे आयोजन.

🔴 वारणानगर येथे "मल्लखांब एक कल्पक खेळ", विषयावरील राष्ट्रीय वेबिनारला उस्फुर्त प्रतिसाद.

🔴 तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीत सन २०२२-२३ मध्ये वेगवेगळ्या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव...

🔴 तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीत सन २०२२-२३ मध्ये वेगवेगळ्या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव... Tatyasaheb Kore Institute of Engineering & Technology (An Autonomous Institute)

🔴 गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर) | Biography | of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)

Post a Comment

0 Comments