यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये प्रोफेशनल बँकिंग प्रशिक्षण आणि नोकरीविषयक मार्गदर्शन" शिबीराचे आयोजन. / Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya (YCWM)

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये प्रोफेशनल बँकिंग प्रशिक्षण आणि नोकरीविषयक मार्गदर्शन" शिबीराचे आयोजन. / Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya (YCWM)
 
महाविद्यालया मध्ये आयोजित "प्रोफेशनल बँकिंग प्रशिक्षण आणि नोकरीविषयक मार्गदर्शन", कार्यक्रमात कोल्हापूर विभागीय उपव्यवस्थापक वृषाली अजमाने यांचे स्वागत प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर. सोबत कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक प्रणव कापसे, प्रा. सत्यनारायण आरडे.

वारणानगर \ प्रतिनिधी : 

वारणानगर, ता. येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये करियर गाईडन्स, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या वतीने  कोल्हापूर येथील इन्स्टीट्यूट ऑफ प्रोफेशनल बँकिंग या संस्थेच्या सहकार्याने एक दिवसीय "प्रोफेशनल बँकिंग", प्रशिक्षण व नोकरीविषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरासाठी १०० हून अधिक बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., एम. ए., एम. एस्सी.ची  पदवी प्राप्त केलेले आणि पदवीच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदविला. 

श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) प्रशासकीय अधिकारी प्रोफेसर डॉक्टर वासंती रासम यांनी प्रशिक्षण उपक्रमास शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते. आमदार डॉ. विनय कोरे सावकर यांच्याविशेष प्रयत्नातून वारणा आणि पन्हाळा- शाहूवाडी मतदारसंघातील विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून या वर्षात सहाव्यांदा प्रशिक्षण आणि नोकरी प्रक्रिया संदर्भात नियोजन करण्यात आले आहे. प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी उपस्थितांचे शाल, श्रीफळ व संदर्भ ग्रंथ देऊन स्वागत केले. 

कोल्हापूर विभाग कंपनीच्या उपव्यवस्थापक वृषाली अजमाने यांनी 'इन्स्टीट्यूट ऑफ प्रोफेशनल बँकिंग', बद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, इन्स्टीट्यूट ऑफ प्रोफेशनल बँकिंग ही भारतामधील एक अग्रगण्य कंपनी असून बँकिंग क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ  पुरवणारी संस्था आहे.  संस्थेच्या शाखा भारतात चौदा राज्यामध्ये कार्यरत आहे. तरुणांनी बँकिंग क्षेत्राकडे जरूर वळावे भविष्य उज्वल आहे असेही त्या म्हणाल्या.

कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक प्रणव कापसे,  यांनी संस्थेचे कार्य, नोकरदारांसाठी  सुविधा व संधी, पात्रता चाचणी परीक्षा, मुलाखतीची प्रक्रिया, नेमणूक, कामाचे स्वरूप इत्यादी विषयावरती माहिती दिली. ते म्हणाले की, प्रारंभी प्रशिक्षणार्थींना वार्षिक दोन लाख चाळीस हजार ते तीन लाख वीस हजार पर्यंतचे वार्षिक वेतन प्रशिक्षण कालखंडात दिले जात असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा फायदा करून घेण्याविषयी आव्हान करून बँकिंग क्षेत्रामध्ये व अन्य बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे संभाषण आणि तांत्रिक कौशल्ये आत्मसात असणे आवश्यक आहे. आपल्याच भागातील याच महाविद्यालयात शिकून गेलेल्या व उत्तुंग यश प्राप्त केलेल्या काही विद्यार्थ्यांची उदाहरणे देऊन ग्रामीण भागातील तरुणांमध्ये प्रचंड क्षमता आहे तरुणांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे असे प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर विद्यार्थ्यांना सांगत होते .

दुसऱ्या सत्रामध्ये प्रश्नोत्तर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी योग्य उत्तरे देऊन त्यांना मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी २५ विद्यार्थ्यांची पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात झाली. प्रशिक्षण व मुलाखतीसाठी १०० हून अधिक विद्यार्थी- विद्यार्थीनींनी उपस्थित होते. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये प्लेसमेंट सेलच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध कंपन्याचे कॅम्पस ड्राईव्हमध्ये १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या ९०० हून अधिक तरुण-तरुणींना प्रशिक्षण प्राप्त झाले. त्यामुळे ३०० हून अधिक विद्यार्थींना नोकरीसाठी निवड झाली. समारोपात डॉ. आर. एस. पांडव यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा. सत्यनारायण आरडे यांनी केले.


  हे हि वाचा :  

🔴 वारणानगर येथे "मल्लखांब एक कल्पक खेळ", विषयावरील राष्ट्रीय वेबिनारला उस्फुर्त प्रतिसाद.

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये जी-२० परिषद आणि पर्यावरण जनजागृती यावरती ऑनलाईन वेबिनार.

🔴 तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीत सन २०२२-२३ मध्ये वेगवेगळ्या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव...

🔴 तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीत सन २०२२-२३ मध्ये वेगवेगळ्या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव... Tatyasaheb Kore Institute of Engineering & Technology (An Autonomous Institute)

🔴 गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर) | Biography | of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)

🔴 भारत देशाचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदीजींची जीवनकहाणी. Narendra Modi Prime Minister of India 

Post a Comment

0 Comments