यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या खेळाडूंची राष्ट्रीय बास्केट बॉल स्पर्धेसाठी निवड. / Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya (YCWM)

 

येथील वारणा महाविद्यालयाच्या बास्केटबॉल खेळाडूंना शुभेच्छा देताना आमदार डॉ. विनय कोरे शेजारी प्रशिक्षक उदय पाटील, रोहित घेवारी आदी.

वारणानगर \ प्रतिनिधी : 

दिल्ली येथे ६ ते १२ जून दरम्यान होणाऱ्या ६६ व्या राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेसाठी यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या खेळाडूंची १९ वर्षाखालील  महाराष्ट्र संघात झाली आहे. मुलांच्या संघामध्ये शंभूराजे मोहन जाधव, साद युसूफ मुल्ला, पार्थ धनाजी इंगवले तसेच मुलींच्या संघामध्ये पूर्वा सुरेश भोसले, सानिका नारायण फुले, समीक्षा प्रकाश पाटील व देवयानी अभिजित पाटील यांची संघामध्ये तसेच राखीव खेळाडूमध्ये मनस्वी संभाजी मोरे व श्रावणी दिपक भोसले यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र संघाची निवड चाचणी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे पार पडली. निवड चाचणीसाठी महाराष्ट्रतील सर्व जिल्ह्यातून ५५ मुले व ३२ मुली सहभागी झाले होते.

सर्व खेळाडूंना वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी वासंती रासम, प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांचे प्रोत्साहन लाभले. क्रीडा संचालक  अण्णासाहेब पाटील, क्रांतिकुमार पाटील, क्रीडा मार्गदर्शक उदय जाधव, उदय पाटील व रोहित घेवारी यांचे मार्गदर्शन लाभले.



  हे हि वाचा :  

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये प्रोफेशनल बँकिंग प्रशिक्षण आणि नोकरीविषयक मार्गदर्शन" शिबीराचे आयोजन.

🔴 वारणानगर येथे "मल्लखांब एक कल्पक खेळ", विषयावरील राष्ट्रीय वेबिनारला उस्फुर्त प्रतिसाद.

🔴 तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीत सन २०२२-२३ मध्ये वेगवेगळ्या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव...

🔴 तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीत सन २०२२-२३ मध्ये वेगवेगळ्या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव... Tatyasaheb Kore Institute of Engineering & Technology (An Autonomous Institute)

🔴 गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर) | Biography | of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)

🔴 भारत देशाचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदीजींची जीवनकहाणी. Narendra Modi Prime Minister of India 

Post a Comment

0 Comments