यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील २९९ विद्यार्थ्यांची निवड /Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya (YCWM)

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील २९९ विद्यार्थ्यांची निवड /Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya (YCWM)


 वारणानगर : 

येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्यावतीने एन. आय. आय. टी. च्या सहकार्याने ॲक्सिस बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी एक दिवशीय प्रशिक्षण व कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण व नोकरीच्या मुलाखत शिबिरासाठी शंभरहून अधिक बी. ए., बी. कॉम. व बी. एस्सी. पदवीच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. सदरच्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये दीपा पाटील, संजय बाबर, हर्षदा पाटील, शिवम पाटील, तेजस घेवारी, शुभम पाटील, अंकिता इंगळे, अमृता तोरस्कर, अंजली जाधव या विद्यार्थ्यांची असिस्टंट मॅनेजरपदी ४.४२ लाख प्रति वर्ष पॅकेजसह निवड झाली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य प्रा. डॉ. ए. एम. शेख यांच्या हस्ते या पदाच्या प्रशिक्षणासाठीचे प्रवेशपत्र, गुलाब पुष्प व ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनयजी कोरे (सावकर), प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. वासंती रासम मॅडम यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. 

 कोरे अभियांत्रिकीतील शुभम पंडित यांची इंडियन आर्मी मध्ये लेफ्टनंट पदी निवड...

महाविद्यालयातील करिअर गाईडन्स, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीक्षम बनवण्यासाठी वर्षभर विविध करिअरविषयक व्याख्याने, शिबिरे, समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात आले. या प्रयत्नांचे फलित म्हणून गतवर्षी 290 हून अधिक मुलांचे विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झाले. यामध्ये प्रामुख्याने कॅलिक्स केमिकल्स अँड फार्मा लि., मुंबई, ब्रासिका फार्मा, मुंबई, स्टेट स्ट्रीट एच सी एल सर्विसेस, पुणे, युएसव्ही प्रा. लि., चिपळूण, रूट्स बायोटेक प्रा. लि., पुणे, आयसीआयसीआय लोम्बार्ड, सोलापूर, रोडियम प्रा. लि., पुणे, संजय घोडावत फूड फॅक्टरी, हातकणंगले, रुबीकाॅन रिसर्च, सातारा, यु व्ही टेक सोल्युशन, सांगली, रॉस लाइफ सायन्स, पुणे इ. नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थी कार्यरत आहेत. गत शैक्षणिक वर्षामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंटचे पदाधिकारी श्री. सत्यनारायण आरडे (समन्वयक), श्री. दिनेश पाटील, डॉ. भीमराव वानोळे व डॉ. चंद्रकांत जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


  हे हि वाचा : 

 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात वन सप्ताह निमित्त २२५ वृक्षांचे रोपण.../Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya (YCWM)

➦ गतीशील विचारांचा कृतीशील नेता आमदार डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर) | Biography | of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)

➦ तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीत सन  २०२२-२३ मध्ये वेगवेगळ्या कंपनीत  निवड  झालेल्या  विद्यार्थ्यांचा  गौरव... 

➦ यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालया मध्ये "जागतिक पर्यावरण दिन", विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

➦ यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या "वारणा २०२२-२३" या शैक्षणिक वार्षिक नियतकालिक अंकाचे प्रकाशन संपन्न...

Post a Comment

0 Comments