नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने जागतिक मैत्री दिन साजरा केला.

नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने जागतिक मैत्री दिन साजरा केला.

वारणानगर  (प्रतिनिधी) आज रविवार, दि .४ ऑगस्ट २०२४ रोजी नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने जागतिक मैत्री दिन शाळेच्या वसतीगृह प्रमुख व क्रीडा मार्गदर्शक श्री विक्रम पाटील , सर्व क्रीडा शिक्षक व रेक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळगडाच्या निसर्गरम्य वातावरणात साजरा केला.  निसर्ग ही परमेश्वराने माणसाला विनामुल्य दिलेली एक सुंदर देणगी आहे. माणूस हा देखील याच निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे. निसर्ग पृथ्वी, आप, अग्नी, वायु आणि आकाश या पाच तत्त्वांनी बनवलेला आहे. मानवी देहदेखील या पंचतत्त्वातूनच तयार झालेला आहे. म्हणूनच माणसाचे  जीवन निसर्गावर अवलंबून आहे. माणूस या निसर्गात जन्माला येतो, जीवन जगतो आणि याच निसर्गात विलिन होतो. म्हणूनच या निसर्गाची  काळजी घेणं आणि निसर्गाचं संवर्धन करणं हे माणसाचं पहिलं कर्तव्य असायला हवं. निसर्गाकडून माणसाला अनेक गोष्टी शिकता येतात. जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न, पाणी, निवारा, शुद्ध हवा औषधी वनस्पती सारं काही या निसर्गाकडूनच मिळतात. अशा विस्मयकारक आणि अद्भूत निसर्गाचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. पन्हाळगडाच्या नयनरम्य वातावरणात झाडांच्या सानिध्यात मैत्री दिन साजरा करत असताना निसर्ग हाच आपला सर्वोत्तम मित्र असे भाष्य करत शाळेचे क्रीडा प्रशिक्षक, रेक्टर व इयत्ता पाचवी ते बारावी च्या सर्व विद्यार्थ्यांनी जागतिक मैत्री दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा  दिल्या. निसर्ग व आजूबाजूचा परिसर याचे जतन करत असताना त्याचा वापर कसा केला पाहिजे याचे मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांनी पन्हाळा गडाच्या दिशेने जात असताना समाज प्रबोधनासाठी घोषणा देत आपला उत्साह दर्शवला.

वृक्ष हा मानवाचा जीवनदायी मित्र आहे. झाडे ही माणसाचे मित्र, उगारू नका त्यांच्यावर शस्त्र. वृक्ष सारखा परम पवित्र नसे दुजा मित्र. हाक देतसे धरती आई, जतन करूया वनराई वृक्ष आमचा सगासोयरा, तोचि आमचा मित्र खरा 






 Promoted Content : 

🔴आदर्श मल्टिपर्पज सोशल असोशिएशन वारणानगर, यांचा आदर्श गौरव पुरस्कार 2024 सोहळा उत्साहात संपन्न.

🔴 वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते || सहकार महर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे. || 

🔴 प्रणाली पाटील यांना राजश्री छत्रपती शाहू पुरस्काराने सन्मानित...

🔴 ज्येष्ठ अध्यापिका सौ. शकुंतला प्रकाश चिकुर्डेकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ पार पडला.

🔴 | Biography | of Dr. Vinay Vilasrao Kore (Savkar)

Post a Comment

0 Comments